Powered by

Sandip Khare Unplugged   iCal entry for this event

महाराष्ट्र मंडळ लंडन सादर करीत आहे


संदीप खरे Unplugged - कविता आणि गप्पांची हसरी खेळती मुक्त मैफिल !!

संदीप खरे हे मराठी साहित्य आणि कला क्षेत्रातील एक अद्वितीय नाव आहे. त्यांच्या कवितांमधून ते जीवनातील भावना, प्रेम, दु:ख, प्रेरणा आणि विचार उत्तम प्रकारे प्रकट करतात. ते केवळ कवीच नाहीत, तर प्रभावी गीतकार, गायक, परफॉर्मिंग आर्टिस्ट आणि अभिनेता आहेत.

“संदीप खरे Unplugged” हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, भावना व्यक्त करण्याचा, विचार मांडण्याचा आणि स्वतःला नव्याने समजून घेण्याचा एक प्रवास आहे. प्रेक्षकांना त्यांच्या कवितांमधून प्रेरणा घेऊन आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप :

1. गप्पा आणि संवाद:

संदीप खरे त्यांच्या सर्जनशील प्रवासातील विविध पैलू उलगडतील, त्यांच्या लेखनप्रक्रियेविषयी आणि जीवनातील अनुभव शेअर करतील.

2. कविता सादरीकरण:

त्यांच्या अनोख्या अभिव्यक्तीतून कवितांचे सजीव सादरीकरण, ज्यामध्ये गाजलेल्या आणि अप्रकाशित कवितांचा समावेश असेल.

3. पडद्यामागच्या गोष्टी:

त्यांच्या सहकाऱ्यांसोबतच्या सहकार्याविषयी, चित्रपटसृष्टीतील आव्हानांविषयी आणि अनुभवांविषयी चर्चा.

4. प्रेक्षकांशी थेट संवाद:

प्रेक्षकांना थेट संवाद साधण्याची, प्रश्न विचारण्याची आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी.

सहकलाकार: अमित सावरगांवकर

अमित हे एक मनस्वी कवी, अभिनेता आणि नाट्यप्रयोग तसेच लघुपटांचे निर्माते आहेत. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये तसेच वेब सिरीजमध्ये अभिनय केला आहे. जीवनातला प्रत्येक क्षण काहीतरी शिकवतो, तो साध्या सोप्या शब्दांमध्ये गुंफण्याचा आणि काव्यनाटयरूपात सहज पद्धतीने सादर करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.


शनिवार ७ जून २०२५ - दुपारी २ ते ४ - महाराष्ट्र मंडळ लंडन , ३०६, डॉलीस हिल लेन, लंडन NW2 6HH


खास आपल्यासाठी, कार्यक्रमा नंतर चहा, गरमागरम बटाटे वडे, पोहे आणि गप्पा


---------------------------------------------------

Maharashtra Mandal London presents: Sandeep Khare Unplugged – A Cultural Experience

Sandeep Khare is a unique name in the world of Marathi literature and arts. Through his poetry, he beautifully expresses emotions, love, sorrow, inspiration, and reflections on life. He is not only a poet but also a gifted lyricist, singer, performing artist, and actor.

Sandeep Khare Unplugged is not merely an entertainment programme – it is a journey of emotional expression, thoughtful reflection, and self-discovery. The primary aim of the event is to inspire the audience through his poetry, encouraging introspection and deeper thought.

Programme Format:

  1. Conversations and Dialogue: Sandeep Khare will share various aspects of his creative journey, his writing process, and life experiences.
  2. Poetry Recitation: A live and expressive recitation of both popular and unpublished poems in his unique style.
  3. Behind-the-Scenes Stories: Discussions about his collaborations, challenges faced in the film industry, and personal experiences.
  4. Live Interaction with the Audience: An open opportunity for the audience to engage, ask questions, and exchange thoughts directly with him.


Co-Performer: Amit Sawargavkar

Amit is a thoughtful poet, actor, and a producer of plays and short films. He has acted in Hindi and Marathi films as well as web series. His endeavour is always to capture the lessons of everyday life and present them in a simple, poetic, and theatrical form that resonates with the audience.


Saturday, 7 June 2025 – 2:00 PM to 4:00 PM

Maharashtra Mandal London, 306 Dollis Hill Lane, London NW2 6HH


Especially for you – after the event:

Tea, hot batata vadas, pohe, and friendly conversations!

Location: Maharashtra Mandal London, 306, Dollis Hill Lane, NW2 6HH

Contact:

Select dates - show past events

Sorry this event is in the past.

Description Date Start time End time Availability Places
available
Price Book
places
Standard Ticket 07-06-2025 14:00 16:00 closed 59